Special Report | नव्या व्हेरियंटनं चिंता वाढवली
कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
पुणे : कोरोनाची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळले आहेत. एकूण सात जणांना या नव्या व्हेरिएंटची लागण झाली असून रुग्णांमध्ये एका 9 वर्षीय मुलाचादेखील समावेश असल्याची माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिली आहे. त्यांनी पुण्यात ही माहिती दिली. मात्र असे जरी असले तरी या नव्या व्हेरिएंटचा शरीरावर फार घातक परिणाम नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असेदेखील आवटे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
