Mumbai KK Home | पार्श्वगायक केके यांच्या मुंबईतील घराबाहेर फॅन्सची गर्दी जमायला सुरूवात

सिद्धी बोबडे

सिद्धी बोबडे | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Jun 02, 2022 | 2:58 PM

केके च्या चाहत्यांनी मुंबईतील घराबाहेर जमायला सुरवात केली आहे. गुजरात मधून आलेल्या याचाहत्यांने त्याचं गाणं ऐकवंल आहे.

आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक केके (KK Passes Away) यांच्या निधनाने संपूर्ण संगितविश्व हादरलंय. त्यांच्या लाखो चाहत्यांना ही तितकाच धक्का बसला आहे.  कोलकातामधील (Kolkata) लाईव्ह शोदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कार्डिॲक अरेस्टने (Cardiac Arrest) केके यांचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय.आज त्याच्या मुंबईतील घराबाहेर त्यांच्या फॅन्सनी यायला सुरवात केली. असाच गुजरातहून आलेल्या केकेच्या चाहत्याशी संवाद साधला आहे टिव्ही 9 चे प्रतिनिधी गिरिष गायकवाड यांनी. केकेच्या अचानक जाण्यानं सर्वानाच धक्का बसला आहे. केके च्या चाहत्यांनी मुंबईतील घराबाहेर जमायला सुरवात केली आहे. गुजरात मधून आलेल्या याचाहत्यांने त्याचं गाणं ऐकवंल आहे. आमचं बालपणचं कुठेतरी संपलं असं या चाहत्याला वाटतं आहे. अख्खा तरूणरपणाचा काळ हा केकेची गाणी ऐकण्यात गेला. आता त्यांच्या आवाजात नवीन गाणं ऐकता येणार नाही ह्याचं दु:ख आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI