Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
जालना येथे स्थानिक क्रिकेटचे सामने सुरु असताना एका तरुणाचा क्रिकेटच्या मैदानावरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मैदानातील क्रिजवर हा तरुण खाली पडून तडफडू लागल्याचे दिसत आहे.त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल केले परंतू त्याआधीच त्याचे प्राण गेले होते.
तरुणवयाच हृदयविकाराचे झटके येऊन मृत्यू होण्याच्या घटना अलिकडे वाढलेल्या आहेत. अशाच प्रकारे जालना येथे नाताळ निमित्त क्रिकेटचे सामने सुरु असताना एका तरुणाला खेळताना क्रिजवरच हॉर्ट अटॅक आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले आहे. या तरुणाचे नाव विजय पटेल असे असून येथे त्याची सासुरवाडी असून अनेक नातेवाईक देखील राहतात. विजय पटेल मुंबईला राहाणारा आहे. तो सुट्टी निमित्त सासुरवाडीला आला होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अलिकडे तरुण वयातच हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याच्या घटना वाढतच आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

