Aaditya Thackeray : 40 गद्दारांना अधिकार नाही तिथे बसण्याचा, एकनाथ शिंदेंच्या गटावर आदित्य ठाकरेंची टीका
कोरोनानंतर दहिहंडी सण साजरा करता येतोय. यात कुठेही राजकारण नसणार. वरळीत करा, वांद्र्यात करा, सगळ्यांनी सण साजरा करावा. ही आमची भावना आहे, असंही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘हे सरकार बेईमानीचं सरकार आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे. जनतेचा आवाज सरकारला ऐकू येत नाही. शिंदे गट घटनेच्या विरोधात काम करतात. आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागितला आहे. 40 गद्दारांना अधिकार नाही. व्हीप आमचाच आहे. वरळी सगळ्यांना आवडतेय. तेथे दहीहंडी साजरी करायची असल्यास करावी. कोरोनानंतर (Corona) हा सण साजरा करता येतोय. यात कुठेही राजकारण नसणार. वरळीत करा, वांद्र्यात करा, सगळ्यांनी सण साजरा करावा, ही आमची भावना आहे, असंही माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत

