उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेबाबत शिवसेनेच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं, “… काही परिणाम होणार नाही”
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतील खेडच्या सभेमागचं राजकारण काय? शिवसेना नेत्यानं नेमकं काय सांगितलं... बघा व्हिडीओ
अमरावती : उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेकरता मुस्लिमांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले आहे. यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कुणी बोलले म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहत नाही. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर मुस्लिम समाज हा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे. यामुळे आता उद्या होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते काय बोलतील कुणावर नेमकी टीका करतील, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

