AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel | अब्दुल सत्तार आमच्या गिणतीतच नाहीत, खासदार इम्तियाज जलील यांचा पलटवार

Imtiaz Jaleel | अब्दुल सत्तार आमच्या गिणतीतच नाहीत, खासदार इम्तियाज जलील यांचा पलटवार

| Updated on: Aug 05, 2022 | 3:56 PM
Share

Imtiaz Jaleel | अब्दुल सत्तार हे आमच्या खासगिणतीतच नसल्याचा पलटवार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Imtiaz Jaleel | अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आमच्या खासगिणतीतच नसल्याचा पलटवार औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel)यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना औरंगाबादचे नाव बदलल्याविरोधात एमआयएम त्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करणार असा इशारा खासदार जलील यांनी दिला होता. त्यावर शिंदे गटातील (Shinde Group) आमदार अब्दुल सत्तार यांनी जलील यांना झेंडे दाखवले तर दांडे दाखवू असा इशारा दिला होता. त्यावर आता जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार हे बडबड करणारे नेते आहेत. आमच्या विरोधात असे अनेक नेते बडबड करत असतात. त्यांना माहिती आहे की, अशी बडबड केली की, त्यांचा टीआरपी वाढतो. त्यामुळे त्यांची बडबड सुरु असते असा आरोप त्यांनी केला.