अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर… ‘त्या’ टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार

अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या नटसम्राट टीकेवर पलटवार केला आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा, असे कोल्हे म्हणाले.

अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर... 'त्या' टीकेवर अमोल कोल्हे यांचा पलटवार
| Updated on: Apr 15, 2024 | 4:41 PM

अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतला परफॉर्मन्स बघावा. मग अजित दादांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या नटसम्राट टीकेवर पलटवार केला आहे. अमोल कोल्हे दौऱ्यानिमित्त खेड तालुक्यातील काळूस गावात आले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढचं म्हणेल, मी जे काही केलं ते स्वकर्तृत्वाने केलं. माझे काका नटसम्राट नव्हते, असेही ते म्हणाले तर महायुतीच्या जागा वाटपावरूनही अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. महायुतीला अजूनही उमेदवार आयात करावे लागतात. काही उमेदवार तर भाजपचे तिकीट परत करतायत. महायुती अजूनही बॅकफूटवर असून महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावाही अमोल कोल्हे यांनी केला. दरम्यान, तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती.

Follow us
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.