Sidharth Shukla Dies | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, मनोरंजन क्षेत्रात हळहळ
अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता आणि त्याला यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. अशा स्थितीत सिद्धार्थच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या मुंबई पोलिसांची टीम कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. दिवंगत सिद्धार्थची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे शवविच्छेदन दुपारी साडे बारा वाजता केले जाईल, असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

