Ladki Bahin Yojana Video : ‘भावां’नी दिलेली नियमबाह्य ‘लाडक्या बहिणीं’ची ओवाळणी रिटर्न? अशी होणार अर्जांची तपासणी
निवडणुकीपूर्वी आणि निवडणूकीनंतर विधानांमध्ये कसा बदल होतो तेच समोर आले आहे. एकाही लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचे महायुतीच्या तिनही नेत्यांनी निवडणुकीआधी म्हटले होते. मात्र आता त्यांच्यात भूमिकेत बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
नियमात नसलेल्या महिलांकडून सरकार लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे परत घेणार का? या प्रश्नावर महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं उत्तरं अनेक बहिणींसाठी महत्त्वाचं आहे. कारण यापूर्वी सर्व निकष तपासूनच पैसे दिलेत किंवा एकाही बहिणीकडून पैसे परत घेतले जाणार नाही, असं म्हणणाऱ्याच्या भूमिकेत बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनंतर आता अर्थमंत्री अजित पवार यांनीही निकषात न बसणाऱ्या महिलांना आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे. भुजबळांनी तर निकषा न बसणाऱ्या महिलांकडून दंडासह रक्कम वसूल कऱण्यात येणार असल्याचा इशारा दिलाय. मात्र सरकार आता चलनाद्वारे पैसे परत घेऊ लागलंय. निवडणुकीआधी सर्वच अर्ज निकष तपासून मंजूर झाल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांनीही आता आपली भूमिका बदलली असल्याचे दिसतंय. सत्तेत आल्यानंतर महिलांच्या अर्जांची फेर तपासणी करणाऱ नसल्याची भूमिका फडणवीस यांनी मांडली होती. मात्र आता पाच चाचण्याद्वारे लाडक्या बहिणींना पास व्हावं लागणार आहे. कशी होणार लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

