Thackeray – Rane : ठाकरे-राणेंमध्ये टशन; राणेंना पाहून आदित्य म्हणाले कचरा…शी…शी..शी!
अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये टशन सुरु आहे. त्याचा प्रत्यय आज देखील आला.
अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये टशन सुरु आहे. विधानभवनातल्या पोडियमवर आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले. पण त्याआधी नितेश राणे पत्रकारांशी संवाद साधत होते. नितेश राणेंना पाहून आदित्य ठाकरे काहीसे माघारी फिरले. त्यानंतर काय झालं असं भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरेंना विचारलं. त्यावर थोडा वेळ थांबू, कचरा साफ करायचं सुरु आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. त्यानंतर शी..शी..शी असं म्हणत आदित्य ठाकरे माघारी परतले.
काही दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमनेसामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणेंनी त्यांच्या आवाजाची नक्कल केली होती. विधानसभेत आदित्य ठाकरे आणि निलेश राणेंमध्येही चांगलीच खडाजंगी झाली होती. संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियान गँग असा उल्लेख केला होता. त्यावर हिंमत असेल तर नाव घेऊन बोला असं चॅलेंज निलेश राणेंनी दिलं होतं. त्यामुळे विधान भवनात आता ठाकरे – राणे यांच्यात चांगलीच टशन बघायला मिळत आहे.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली

