आदित्य ठाकरे आणि संजय राऊत थोड्याच दिवसात जेलमध्ये जाणार, केंद्रीय मंत्र्यानं दिला इशारा
थोड्याच दिवसांनी आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावं लागणार, असल्याचं मोठं वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्यानं केलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत देखील जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा या केंद्रीय मंत्र्यानं दिला
सिंधुदुर्ग, २७ नोव्हेंबर २०२३ : थोड्याच दिवसांनी आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावं लागणार, असल्याचं मोठं वक्तव्य एका केंद्रीय मंत्र्यानं केलं आहे. तर आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत देखील जेलमध्ये जाणार असल्याचा इशारा या केंद्रीय मंत्र्यानं दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. दिवसाढवळ्या होते ते पळाले, एकनाथ शिंदे त्यांना घेऊन गेले, दौऱ्यावर येतात आणि जे जाहीर सभा घेऊ शकत नाही ते खळा बैठका घेताय, असा खोचक टोलाही नारायण राणे यांनी लगावला. थोड्याच दिवसांनी आदित्य ठाकरे या खळा बैठकाही घेणार नाही तर सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात तो जेलमध्ये असेल, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला.
Latest Videos
Latest News