AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray : इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? मुसळधार पावसानंतर आदित्य ठाकरे बरसले

Aditya Thackeray : इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? मुसळधार पावसानंतर आदित्य ठाकरे बरसले

| Updated on: May 26, 2025 | 4:37 PM
Share

Mumbai metro flooded : मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रोला देखील बसला असून भुयारी स्थानकात पाणी शिरलं आहे.

राज्यासह मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. जागोजागी पाणी साचलेलं असल्याने मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेले आहेत. अशातच मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला देखील या पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे गेले असता त्यांना देखील अडवण्यात आलेलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि महायुती सरकारवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो 3 च उद्घाटन झालं. तिथे आत जाऊन देत नाही. इमर्जन्सीसारखी स्थिती आहे. म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे, ते पहा. भाजपाची केंद्रात, राज्यात मागच्या 10 वर्षांपासून सत्ता आहे. सर्व यंत्रणा सीएम ऑफिस आणि नगरविकास खात्यातून चालतात. त्या किती निक्क्म्या आणि भ्रष्ट आहेत ते दिसतय. मुंबईकर भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाहीत, अशी टीका यावेळी ठाकरेंनी केली.

Published on: May 26, 2025 04:37 PM