Ahilyanagar : डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी… अहिल्यानगरात भयंकर घडतंय, प्रकरण नेमकं काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता आणि साकुरी परिसरात आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा उद्रेक झाल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत १६ बाधित डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. हा आजार मनुष्य किंवा इतर प्राण्यांसाठी हानिकारक नसला तरी डुकरांमध्ये वेगाने पसरत असल्याने, १ किलोमीटरच्या परिघातील डुकरांवर कलिंगची कारवाई सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात आफ्रिकन स्वाइन फिव्हर आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी साकूर येथे डुकरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळली. पशुसंवर्धन विभागाने त्वरित कारवाई करत, बाधित डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे १६ डुकरांना मारून पुरण्यात आले आहे. हा आजार मनुष्यांसाठी किंवा गायी-म्हशींसारख्या इतर प्राण्यांसाठी हानिकारक नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, डुकरांमध्ये याचा फैलाव अत्यंत वेगाने होतो. त्यामुळे साकूर येथील बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील डुकरांचा शोध घेऊन त्यांच्यावरही हीच प्रक्रिया केली जात आहे, जेणेकरून रोगाचा प्रसार रोखता येईल. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या सहकार्याने परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे कामही सुरू आहे. बाधित डुकरांच्या मालकांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...

