Special Report | 34 दिवसांनी शिंदे-भाजप सरकारचा विस्तार झाला आणि 7 तक्रारही समोर आल्या

34 दिवसांनी शिंदे-भाजप सरकारचा विस्तार झाला खरा, मात्र त्या विस्तारानंतर ७ तक्रारही समोर आल्या आहेत. पहिली तक्रार एका तरुणीच्या मृत्यूवरुन आरोप झालेले संजय राठोडांची. मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरची दुसरी तक्रार म्हणजे बच्चू कडू. मंत्रीमंडळ विस्तारावरुन तिसरी म्हणजे भाजपचे मित्रपक्ष. चौथी तक्रार म्हणजे पहिल्या टप्प्यात एकही महिला मंत्री नसणं. पाचवी तक्रार म्हणजे मुंबईतून फक्त पहिल्या टप्प्यात मंगलप्रभात लोढांना मंत्रीपद देणं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वनिता कांबळे

Aug 09, 2022 | 9:25 PM

मुंबई : 34 दिवसांनी शिंदे-भाजप सरकारचा विस्तार झाला खरा, मात्र त्या विस्तारानंतर ७ तक्रारही समोर आल्या आहेत.  पहिली तक्रार एका तरुणीच्या मृत्यूवरुन आरोप झालेले संजय राठोडांची(sanjay rathod). राठोडांनी शपथ घेताच भाजपच्या चित्रा वाघांनी(chitra wagh) ट्विट करुन याला दुर्देवी म्हटलं. कारण ठाकरे सरकारमध्ये याच संजय राठोडांच्या मंत्रीमंडळातून हकालपट्टीसाठी चित्रा वाघ आक्रमक होत्या. आता जेव्हा चित्रा वाघांचं सरकार आहे. तिथंही राठोड मंत्री झाल्यानंतर राठोडांविरोधात लढा सुरुच ठेवणार
असल्याचं चित्रा वाघांनी म्हटलंय.

मात्र यातला एक फरक म्हणजे जेव्हा भाजप विरोधी बाकांवर होती. तेव्हा चित्रा वाघ आणि किरीट सोमय्या गैरव्यवहारांचे आरोप झालेल्यांवर थेट सरकारकडे कारवाईचा आग्रह धरत होते., मात्र आता जेव्हा भाजप सत्तेत आहे, तेव्हा चित्रा वाघ आणि सोमय्या सुद्धा न्यायालयाकडे बोट दाखवतायत.

मात्र आता जे विरोधक संजय राठोडांवरुन चित्रा वाघांना प्रश्न करतायत, तेच जेव्हा सत्ताधारी होते, तेव्हा संजय राठोडांवर कोणताही
गुन्हाच दाखल करु शकले नाहीत. तेव्हा राठोडांना पाठिंबा देणारे आता राठोडांवरुनच प्रश्न करतायत. तरुणीचा मृत्यू आकस्मिक
किंवा आत्महत्येनं झाल्याच रिपोर्ट पुणे पोलिसांनी दिलाय. त्याचा अर्थ म्हणून राठोडांना क्लिनचीट असा समजला जातोय.

मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरची दुसरी तक्रार म्हणजे बच्चू कडू. भविष्यात प्रहारचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत बच्चू कडूंनी केलं होतं.
नंतर त्यांनी जलसंपदा आणि ग्रामविकास खात्याचीही मागणी केल्याचं म्हटलं गेलं. मात्र पहिल्या टप्प्यात एकाही अपक्षाला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे आधी शिंदे गट नसला तरी सरकार स्थीर असण्याचं म्हणणारे बच्चू कडू काही दिवसांपूर्वी मंत्रीपदाची लालसा नसल्याचंही म्हटले होते.

मंत्रीमंडळ विस्तारावरुन तिसरी म्हणजे भाजपचे मित्रपक्ष. शपथविधीला सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे या तिघांनाही आमंत्रण नव्हतं विरोधकांकडून फक्त अजित पवार शपथविधीला उपस्थित होते. त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या

विस्तारावरुन विरोधकांची चौथी तक्रार म्हणजे पहिल्या टप्प्यात एकही महिला मंत्री नसणं. मंत्रीपदासाठी सीमा अहिरे, मंदा म्हात्रे, माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, श्वेता महाले यांची नावं चर्चेत होती. मात्र पहिल्या टप्प्यात तरी शिंदे-भाजप सरकारनं एकाही महिलेला मंत्री केलेलं नाही.

पाचवी तक्रार म्हणजे मुंबईतून फक्त पहिल्या टप्प्यात मंगलप्रभात लोढांना मंत्रीपद देणं. माहितीनुसार मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 1995 नंतर पहिल्यांदाच एकही मराठी मंत्री नाही. मुंबई महापालिका तोंडावर असूनही मुंबईमधील शिंदे गटातल्या एकालाही मंत्रीपद मिळालेलं नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें