पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पराभवानंतर अजित पवारांनी पुन्हा कंबर कसली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. खेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. बुट्टे पाटील यांनी गेल्या आठवड्यात अजित पवारांची भेट देखील घेतली होती. भाजपमधून थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत हा पक्ष प्रवेश झाला आहे. मात्र भाजपसाठी हा एक धक्का मानला जातोय.