चिखलात लोळून संतप्त नागरिकांनी कुठं केलं अनोखं आंदोलन, आक्रमक स्थानिकांची मागणी काय?
VIDEO | छत्रपती संभाजीनगरमधील बंबाट नगर परिसरात महानगर पालिकेकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या नसल्याने नागरिक आक्रमक, ना गटाराची कामे ना रस्त्याची कामे त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी भरल्याने चिखळात लोळून नागरिकांचं अनोखं आंदोलन
छत्रपती संभाजीनगर, २७ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमधील बंबाट नगर परिसरात महानगर पालिकेकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही, असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. बंबाट नगर येथे ना गटाराची कामे केली जात आहे ना रस्त्याची कामे त्यामुळे या परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी भरल्याचे दिसून येत आहे. रस्त्यात पडलेले खड्डे आणि खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इतकेच नाहीतर येथील नागरिकांना या भागातून वावरताना मोठी अडचण येत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी येथील खड्यातील चिखलात लोळून निषेध आंदोलन केल्याचे पाहायला मिळत आहे. बंबाट नगर येथील परिसरात महापालिका रस्ते करत नसल्यामुळे नागरिकांचे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. बघा काय आहे छत्रपती संभाजीनगरमधील बंबाट नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या मागण्या…
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

