Mumbai | नको ती मागणी अन्… नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद? २०२४ पासून…तक्रारीतील दाव्याने खळबळ!
नाशिक आयटी कंपनीनंतरच मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद घडतंय का असा प्रश्न समोर आला आहे. आग्रीपाडा परिसरात 2024 पासून सुरू असलेल्या कथित छळप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक आयटी कंपनीनंतरच मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद घडतंय का असा प्रश्न समोर आला आहे. आग्रीपाडा परिसरात 2024 पासून सुरू असलेल्या कथित छळप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला सहकर्मी अश्रफ शेख याने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याची तक्रार समोर आली आहे.
पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने मैत्रीच्या नावाखाली जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लॉजवर भेटून शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच तिच्याकडून वैयक्तिक फोटो मागून मानसिक छळही करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी पालकांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या सतर्कतेने प्रकरण लवकर समोर आलं. पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला असून आरोपीच्या मोबाईल आणि संपर्कांची चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Published on: Apr 24, 2026 10:47 AM
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल

