Plane Crash : दुपारी झोपेत असताना मोठा आवाज… पाहिलं तर धुराचे लोट अन्… अकोल्याच्या तरूणीनं कसं वाचवलं स्वतःला?
विमान अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेतही ऐश्वर्याने लगेच वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन करून माहिती दिली. ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी भीषण विमान अपघात झाला. या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण भारत हादरला आहे. अहमदाबाद येथून लंडनच्या दिशेना जाण्यासाठी निघालेलं विमान अहमदाबाद येथून टेकऑफ होताच अवघ्या काही क्षणात कोसळलं, या दुर्घटनेत एअर इंडियाचं एआय १७१ विमान हे मेघानी या निवासी परिसरात कोसळलं. या ठिकाणी बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल होतं या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळल्याची माहिती आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा हॉस्टेलमधील विद्यार्थी जेवण करत होते. या घटनेत अनेकांचा जीव गेला मात्र सुदैवाने अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल सुखरूप बचावली आहे.
या अपघाताच्या वेळी ऐश्वर्या तोष्णीवाल गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथील हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीत आणि पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. ऐश्वर्या ही झोपलेली असताना अचानक मोठा आवाज झाला. या मोठ्या आवाजाने ऐश्वर्या झोपेतून जागी झाली. तिने डोळे उघडताच सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने जराही वेळ न घालवता स्वतःला एका ब्लँकेटमध्ये लपेटले.ती धुराच्या गर्दीतून आणि अंधारातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरली. तिने कसाबसा आपला जीव वाचवला.

टेस्लाची भारतात दमदार एन्ट्री, मुंबईतील पहिल्या शोरूमची पाटी मराठीत

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवल, बघा VIDEO

राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य

गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले...
