Ahmedabad Plane Crash : मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण, ओळख पटल्यावर मृतदेह ताब्यात देणार
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेची भीषणता आता जाणवायला लागली आहे. मृतांच्या ओळख पटवण्यासाठी आता मृतांच्या नातेवाईकांचे DNA तपासले जात आहेत.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची DNA चाचणी आता पूर्ण झाली आहे. आता DNA मॅच झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. आत्तापर्यंत 192 चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याने या DNA चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अहमदाबाद येथून 242 प्रवाशांसह लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान काल दुपारी टेकऑफ नंतर अवघ्या काही क्षणात खाली कोसळलं आणि मेघानी येथील नागरी वस्तीत कोसळलं. यामध्ये 250 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये विमान प्रवाशांसह, विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहाला धडकलं तेथील काही विद्यार्थ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की आता मृतांची ओळख पटवणं देखील अवघड जात आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे DNA घेतले असून ओळख पटल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले...

कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?

ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे स्पष्टच म्हणाले...

Saamana : बहिणींची 'लाडकी' योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी 'दोडकी'
