Ahemdabad Plane Crash : लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, 1206 त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या लकी नंबरची चांगलीच चर्चा होत आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या लकी नंबरची चांगलीच चर्चा होत आहे. रुपाणी यांच्या आयुष्यात एक असा नंबर होता जो त्यांच्यासाठी फक्त एक नंबर नव्हता तर विश्वासाचे प्रतीक होता. हा नंबर ‘1206 ‘ होता. ते या नंबरला त्यांच्या आयुष्यातील लकी नंबर मानत होते. त्यांच्या सर्व वाहनांच्या, मग ते स्कूटर असो किंवा कार, नंबर प्लेटवर हा नंबर होता. पण 12/06/2025 या तारखेने हा ‘भाग्यवान नंबर’ एका दुर्घटनेत बदलला आणि त्यांचा घात केला आहे. या तारखेला विजय रुपाणी एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या फ्लाईट एआय 171 मध्ये होते, जे अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच क्रॅश झाले. ते त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. मात्र या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुपाणी यांच्या लकी नंबरनेच त्यांचं लक काढून घेतलं अशी चर्चा आता सोशल मिडियावर बघायला मिळत आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना लाथा-बुक्क्यांनी तुडवल, बघा VIDEO

राजीनामा दिलाच नाही... भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही जयंत पाटलांचं भाष्य

गायकवाड, शिरसाटांना शिंदेंची वॉर्निंग तर फडणवीसांची तंबी; म्हणाले...

कोण चड्डी, कोण बनिआन? हिंमत असेल तर... विरोधकांना राणेंचं चॅलेंज काय?
