Asaduddin Owaisi : ‘पाकिस्तानी नेत्यांनी उगाच बकबक…’, भारताला वायफळ अन् पोकळ धमक्या देणाऱ्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे गेल्या मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळत आहे. बघा काय केली टीका?
जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवरच जोरदार टीकास्त्र डागलं आहे. पाकिस्तान हा देश भारत या देशापेक्षा अर्धा तास नाही तर तब्बल तीस वर्षे मागे असल्याचे वक्तव्य करत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानलाच फटकारल्याचे पाहायला मिळाले. तर पाकिस्तानच्या नेत्यांनी उगाचच भारताला वायफळ धमक्या देऊ नयेत, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानलाच खडसावले आहे. इतकंच नाहीतर पाकिस्तानातील नेत्यांनी आता बकबक बंद करावी, तुम्ही तुमच्या घरात अशा दहशतवादी शैतानांना पाळत आहात, अशा स्पष्ट शब्दात असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य करत भारताला सातत्याने धमक्या आणि इशारा देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांवर निशाणा साधला आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

