Air India Dreamliner : आकाशात उंच झेप अन्… अचानक असं काय झालं की बोईंग 787-8 ड्रीमलायनर फिरलं माघारी?
एअर इंडिया फ्लाइट एआय 315 ला उड्डाण दरम्यान तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. हे विमान हाँगकाँगहून दिल्लीला येत होते. मात्र ते माघारी फिरून सुरक्षितपणे हाँगकाँगला आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाड नेमका काय याचा तपास सध्या सुरू आहे.
गेल्या काही दिवसात एअर इंडियाच्या बोईंगच्या ड्रीमलायनर विमानातील तांत्रिक बिघाड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंता वाढवणाऱ्या अनेक घटना घडताना दिसताय. नुकतीच अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघाताची घटना ताजी असताना आता एअर इंडियाच्याच आणखी एका विमानाचं हाँगकाँग एअरपोर्टवरून टेकऑफ करण्यात आल्यानंतर पुन्हा त्याच विमानतळावर लँडिंग करण्यात आलं आहे. एआय 315, हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने टेकऑफ केल्यानंतर आकाशात असताना त्यात काही तांत्रिक बिघाड असल्याच्या संशयामुळे त्या विमानाला हाँगकाँग येथे पुन्हा माघारी फिरावे लागले. अहमदाबाद येथील नुकत्याच झालेल्या विमान अपघातात जे विमान होतं तेच हे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान आहे.