AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजिचदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित? अपडेट आले समोर

अजिचदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित? अपडेट आले समोर

| Updated on: Feb 26, 2026 | 10:15 AM
Share

अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुरक्षित नोंदवला गेला आहे, अधिकाऱ्यांच्या सह्याही त्यावर आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी जनहित याचिका दाखल झाली असताना, रोहित पवार डीजीसीए, व्हीएसआर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यात प्रयत्न करणार आहेत, मुंबई पोलिसांनी नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे की, त्यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली असून, अधिकाऱ्यांच्या सह्याही ब्लॅक बॉक्सवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एएआयबीचे अधिकारी के. रामचंद्र यांनी पाहणी करून ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केली होती.

दरम्यान, या विमान अपघाताच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या या याचिकेत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत. यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता, ज्यामुळे पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली होती. रोहित पवारांनी पाच घटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, ज्यात कटाच्या शक्यतेचाही समावेश आहे. त्यांची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सीआयडीकडे वर्ग केली आहे.

Published on: Feb 26, 2026 10:15 AM