बावनकुळेंना टीका करण्याचा अधिकार ते भाजप नेत्यांचे संस्कार, अजित पवार का संतापले ?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वक्तव्यावर भाष्य केलंय. "टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे. ओबीसींना एकत्र प्रतिनिधित्व मिळत नव्हतं तेव्हा कोर्टात जाऊ ठरलं होतं. आयोग नेमला. त्याचा निकाल सर्वश्रुत आहे.
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर वक्तव्यावर भाष्य केलंय. “टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे. ओबीसींना एकत्र प्रतिनिधित्व मिळत नव्हतं तेव्हा कोर्टात जाऊ ठरलं होतं. आयोग नेमला. त्याचा निकाल सर्वश्रुत आहे. मग एक वर्षात तुम्ही निवडणुका घेतल्या का?” असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. “तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा एकेरी भाषेत टीका केली आहे. त्याला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.ज्यांचे जसे संस्कार आहेत तसं ते बोलतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?”, असं अजित पवार म्हणालेत.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

