अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला; राऊतांच्या विधानाने खळबळ

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार नेहमी सांगायचे ‘माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे’ आणि ती मी उघड करेल… अजित दादांनी 15 जानेवारीला असं सांगितलं होतं. यावरून असं सिद्ध होतं की अजित पवार यांना भाजपमधून बाहेर पडायचं होतं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. अजितदादांनी विधान केल्यानंतर 10 दिवसांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला हे सगळं रहस्यमय आहे, असं देखील राऊत म्हणाले. लोकांच्या मनात अपघातावर शंका उपस्थित झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले. त्याचबरोबर माझ्या मनात तर पहिल्या दिवसापासून शंका आहे असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाना साधला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कि घात यावर प्रश्न निर्माण झाले आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us