Pune Metro | अजित पवारांकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा, ड्रोनमधून पाहा पुण्याची मेट्रो

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते. आता मेट्रोमुळे पुण्याची ओळख ‘आधुनिक पुणे’ अशी होणार आहे, असं सांगतानाच मेट्रोच्या कामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. आज सकाळी 7 वाजताच हा कार्यक्रम पार पडला. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीने पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI