राष्ट्रवादीची तुतारी रामराजे निंबाळकर हाती घेणार? ’14 तारखेला…’, शरद पवारांनी काय दिले संकेत?
'आता मी फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला घेणार ', भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतरच्या सभेत शरद पवार यांनी काय दिले संकेत?
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. इंदापूर येथे शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा हा पक्ष प्रवेश झाला. इंदापूरमध्ये असताना हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांना जोरदार धक्का देणारा संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. १४ ऑक्टोबर रोजी फलटण येथे जाणार असल्याचे सांगत शरद पवार यांच्याकडून रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचे संकेत देण्यात आले. आता मी फलटणला जाणार आहे. जो कार्यक्रम इंदापूरला झाला, तोच फलटणला घेणार आहे. तिथे महिनाभर कार्यक्रम बुक आहे. सर्वजण एकत्र येत आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे आता भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर रामराजे निंबाळकराचा पक्षप्रवेश होणार का? याची चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात

