हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल, ‘खलनायकाला लाजवेल असं…’
कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समजित घाटगे यांच्यात लढत होणार आहे. आज टीव्ही 9 मराठीशी बोलताना मुश्रीफांनी समरजित घाटगेंवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे हे खलनायक प्रवृत्तीचे असल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी केली आहे. खलनायकाला लाजवेल असं समरजित घाटगे यांचं कृत्य असल्याचे वक्तव्य करत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर समरजित घाटगे यांनी दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसलं असल्याचेही हसन मुश्रीफ म्हणाले. परतफेड न करता समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसलं. दरम्यान, पक्षाने सांगितल्यानंतर समरजित घाटगे यांनी थांबालयला हवं होतं, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर निशाणा साधला. इतकंच नाहीतर आजपर्यंत समरजित घाटगे यांनी इतका फायदा भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा घेतला. मात्र गुरुदक्षिणा द्यायच्या वेळी पाठीत खंजीर खुपसून गेले.
Latest Videos
Latest News