ऐन लोकसभेआधी दादांनी काकांना दाखवली ताकद? ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवार यांना जोर का धक्का!
बारामती तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतीचा निकाल लागला. यामध्ये अजित पवार गटाचा ३० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला. तर शरद पवार गटाने या ३२ ग्रामपंचायतींवर पॅनलच उभं केलं नव्हतं. यात विशेष म्हणजे बारामतीत पहिल्यांदाच भाजपनं २ ग्रामपंचायती जिंकल्या.
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | पश्चिम महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निकालात अजित पवार गटाने शरद पवार गटावर मात केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधीच अजित दादांनी काका शरद पवार यांना धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीपूर्वीच अजित पवार यांना काका शरद पवार यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. बारामती तालुक्याचा विचार केल्यास बारामती तालुक्यात एकूण ३२ ग्रामपंचायतीचा निकाल लागला. यामध्ये अजित पवार गटाचा ३० ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला. तर शरद पवार गटाने या ३२ ग्रामपंचायतींवर पॅनलच उभं केलं नव्हतं. यात विशेष म्हणजे बारामतीत पहिल्यांदाच भाजपनं २ ग्रामपंचायती जिंकल्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आणि यानंतर महापालिकेच्या निवडणुका होण्याच्या काही शक्यता नाही. त्यामुळे आता थेट लोकसभेच्या निवडणुका आहेत.
Latest Videos
Latest News