पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार? अजित पवार यांनी मारला डोळा, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या बंडानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांच्या एका कृतीने चर्चांना उधाण आलं आहे.
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या बंडानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांच्या एका कृतीने चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या नाशिक येथील पत्रकार परिषदेत अनोखा प्रकार पाहायला मिळाला. चिन्ह तुम्हाला मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. यावेळी उत्तर देताना अजित पवार यांनी डोळा मारला. पण त्यांनी तो डोळा नेमका कुणाला मारला? यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.याआधीदेखील अजित पवार यांनी डोळा मारल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

