Ajit Pawar : तेरे उपर अॅक्शन लुंगा.. तेरा नंबर दे.. ही कोणती भाषा! दादांनी अधिकाऱ्याला कर्तव्यापासून रोखलं!
सोलापुरातल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून कर्तव्यापासून रोखल्याची क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर अजित पवारांची कृती आणि भाषेवरून जोरदार टीका करण्यात आली. तर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं यावर अजित पवारांनी म्हटलंय.
ऐरवी शिस्त आणि कायद्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका महिला आयपीएस पोलीस अधिकाऱ्याशी बोलण्याची भाषा पाहा.. कारवाई के लिए इतनी डेअरिंग हुई क्या? तेरे ऊपर अॅक्शन लूंगा तेरा नंबर दे मैं आदेश देता हूं.. वो रुकाओ… सोलापुरातल्या कुरडू गावात बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यांवर कारवाई कऱण्याचं हे प्रकरण आहे. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची क्लिप व्हायरल झाली. यानंतर त्यांनी ट्वीटही केलंय.
सोलापूरमधील बेकायदेशीर मुरूम उत्खननाच्या प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते एका महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी तीव्र भाषेत बोलताना दिसत आहेत. या घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता असे म्हटले आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

