Ajit Pawar : अजित पवार यांची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ; नागपूर अधिवेशनात RSS कार्यक्रमापासून दादांची NCP दूर
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पाठ फिरवली. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे कौतुक करत शिवसेना-संघ विचारसरणी मिळतीजुळती असल्याचे म्हटले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील बौद्धिक कार्यक्रमाकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) यावर्षीही पाठ फिरवली. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी मात्र रेशीमबाग येथील कार्यक्रमाला हजेरी लावली. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाची तोंडभरून स्तुती केली. शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळतीजुळती असून, इथे आल्यावर राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आणि ऊर्जा मिळते, असे शिंदे म्हणाले.
संघाच्या बौद्धिकासाठी राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आले होते, मात्र अजित पवारांसह त्यांचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही. ही गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती मानली जात आहे. एका नेत्याच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षरीत्या समर्थन दिले असले तरी त्यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. काही विरोधकांनी शिंदेंच्या विधानावर टीका केली, त्यांच्या विचारसरणीचा संघाशी संबंध जोडणे हास्यास्पद असल्याचे म्हटले.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत

