“…तर मी राजकारण सोडेन”, कृपाल तुमाने यांच्या ‘त्या’ आरोपांवर अजित पवार भडकले
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "अजित पवार अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते", असे कृपाल तुमाने यांनी सांगितलं.कृपाल तुमाने यांच्या आरोपावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “अजित पवार अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते”, असे कृपाल तुमाने यांनी सांगितलं.कृपाल तुमाने यांच्या आरोपावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तुमाने यांनी सांगावं किंवा महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जरी सांगितलं तरी मी राजकारण सोडेन. यांनी सिद्ध करून दाखवावं. सिद्ध करून दाखवलं नाही तर खासदाराने उद्यापासून घरी बसायचं. पण हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ते”,असं अजित पवार म्हणाले.
Published on: Jun 06, 2023 04:16 PM
Latest Videos
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर

