प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार म्हणतात, “आमच्या पक्षाबद्दल…”
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीत असले तरी ते वारंवार राष्ट्रवादी काँग्रेवर टीका करत असतात. कालच्याआपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्यूलर पक्ष असल्याची टीका केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीत असले तरी ते वारंवार राष्ट्रवादी काँग्रेवर टीका करत असतात. कालच्या आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्यूलर पक्ष असल्याची टीका केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. “आमच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांची नेहमीच अशी मतं राहिली आहेत. मागेही आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही. त्यांचं आमच्या पक्षाबदलचं मत वेगळं आहे, हे आम्हाला कळले आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं तुम्हाला वंचितसोबत युती करायची असेल तर करा”, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं अजित पवार म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

