Ajit Pawar Pune LIVE | लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अजित पवार यांचा कंत्राटदारांना सल्ला

ठेकेदाराला सांगतो, पुण्यात वेगवेगळी काम सुरु आहेत, पण काम वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वेळेत हे काम ठेकेदाराने काम पूर्ण करावं, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पुण्यातील राजाराम पूल आणि फनटाईम थिएटरमधील उड्डाणपुलासाठी खूप पाठपुरावा करावा लागला. ठेकेदाराला सांगतो, पुण्यात वेगवेगळी काम सुरु आहेत, पण काम वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता वेळेत हे काम ठेकेदाराने काम पूर्ण करावं, असं अजित पवार म्हणाले. राजकारणाच्या वेळी राजकारण जरुर करु, पण निवडणूका झाल्यावर विकास काम करताना एकत्र येऊन केली पाहिजेत, असंही ते म्हणाले. विकास कामासाठी भूसंपादन करताना एक एकराला 18 -18 कोटी रुपये द्यावे लागले तर काम कशी करायची, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. एक काळ असा होता की लोक मोबदला घ्यायला नको म्हणायचे, अन आता म्हणतात दादा रस्ता थोडा माझ्या शेतातून न्या पण असे जास्त पैसे द्यायला लागले तर कसं होणार, यासाठी समन्वयातून मार्ग लवकरच काढतोय, असंही अजित पवार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI