Video: समस्यांचा पाढा वाचताना ताई थांबेच ना! ‘दादा’ म्हणाले ताई ऐकायला शिका..
कान्होली गावात मोठ्याप्रमाणात पूर आला होता. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याने मदतीची मागणी ते सरकारकडे करीत आहेत.
विरोधी पक्ष नेते अजित पवार सध्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. पुरामुळे कोन्होली गावाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी समस्या सांगताना एका स्थानिक महिलेने अजित पवारांसमोर समस्यांचा अक्षरशः पाढाच वाचायला सुरवात केली. प्रश्नाचे उत्तर देण्याची संधीसुद्धा या महिलेने न दिल्याने शेवटी अजित पवार त्या महिलेला ताई ऐकायला शिका असे म्हणाले. कान्होली गावात मोठ्याप्रमाणात पूर आला होता. नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याने मदतीची मागणी ते सरकारकडे करीत आहेत. याशिवाय इतरही सोयी सुविधेच्या समस्या या परिसरात आहेत.
Published on: Jul 29, 2022 01:34 PM
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
