Ajit Pawar Uncut : काय विनोद, काय टोले, काय राजकारण.. अजित पवारांचं हे भाषण ऐकून तुम्हीच म्हणाल ‘एकदम ओक्केय!’

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी टोलेबाजी करत चिमटे काढले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 03, 2022 | 1:56 PM

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी टोलेबाजी करत चिमटे काढले. आम्ही जावई हट्ट पुरवत आलोय. आता त्याची तुम्हाला परत फेड करावी लागेल. आता आमचा हट्ट पुरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सासऱ्यांकडील लोकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असं ते म्हणाले. राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. त्यांचे सासरे हे विधानसभेचे सभापती आहेत. हाच धागा पकडून त्यांनी ही टोलेबाजी केली. राहुल नार्वेकर जिथे जातात तिथल्या पक्षनेतृत्वाला ते आपलसं करून टाकतात. ते शिवसेनेत होते. तेव्हा आदित्य ठाकरेंना आपलसं केलं. त्यानंतर ते आमच्याकडे आले तर मलाही आपलसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी फडणवीसांना आपलसं करून घेतलं. आता ते शिंदे साहेब तुमचं काही खरं नाही, असं अजित पवार म्हणतात विधानसभेत एकच हशा पिकला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें