Ajit Pawar : कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल.., अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी सुरू केलेली आहे.
बारामतीत आज दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजितदादांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरलेला आहे. काहीही चुकीचं केलं तर मी पोलिसांना मकोका लावायला सांगेल, अशी धमकीच आता अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली बघायला मिळाली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं दिसत होतं. कुत्र्याला जसं मारत असतील तसंच मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असंच चालत राहिलं तर मी मकोका लावीन, माझ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलाने जरी असं केलं तरी त्यांना सुद्धा नियम सारखाच असेल, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

