‘त्यांना’ ‘कायदा आणि व्यवस्थे’चं काही नाही; फडणवीस यांच्यावर कोणाची सडकून टीका
या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये.
मुंबई : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमूळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातंये. याप्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी, अकोल्याच्या घटनेवर मी काय बोलणार? त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी बोलायला हवं. या राज्याला जर गृहमंत्री असतील आणि राजकारणातून त्यांना उसंत मिळत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात ते विचार करतील. पण मला तसं वाटतं नाही की राज्याच्या गृहमंत्र्याला महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात काही आस्था आहे. ते 24 तास फक्त राजकारणात व्यस्त असतात.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

