Akola : माझं लग्न होत नाही, मला पत्नी द्या… तुमचे उपकार… अकोल्यातील तरूणाचे थेट पवारांना पत्र, अनिल देशमुख म्हणाले…
अकोल्यातील एका तरुणाने शरद पवार यांना पत्र लिहून लग्नासाठी वधू मिळवून देण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाच्या गंभीर समस्येवर प्रकाश पडला आहे.
अकोल्यातील एका तरुणाचं पत्र सध्या चांगलंच चर्चेत आहे. या तरूणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहून लग्नासाठी वधू मिळवून देण्याची विनंती केली आहे. ग्रामीण भागातील मुलांची लग्नाची वये उलटून जात असूनही त्यांना मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या या पत्रातून समोर आली आहे. तर शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांना हे पत्र वाचायला सांगितले होते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी या तरुणाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे मुली शहरांमध्ये स्थायिक होण्यास प्राधान्य देत असल्याचे निरीक्षणही अनिल देशमुख यांनी नोंदवले आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

