Mumbai | सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी

लोकल सेवा सरसकट सुरू करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे सर्व पालन करून प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला जाणार आहे, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

मागील तीन महिन्यांपासून वसई-विरार, कल्याण-कसारा-कर्जत, पनवेल याठिकाणांहून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि वाहतूक कोंडीचा खूप मोठा सामना करावा लागत आहे.  सर्वसामान्य नागरिकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागतेय. आता त्यांच्यावर आत्महत्येशिवाय पर्याय दिसून येत नाही. त्यामुळे लोकल सेवा सरसकट सुरू करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी कोरोना नियमांचे सर्व पालन करून प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविला जाणार आहे, असे महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI