AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | पहाटेचा शपथविधी अजितदादांचा पिच्छा सोडेना!

Special Report | पहाटेचा शपथविधी अजितदादांचा पिच्छा सोडेना!

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: May 15, 2022 | 11:18 PM
Share

पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय वाद

मुंबई : काल बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी सभा जंगी सभा घेतली. त्या सभेत त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा समाचार घेतला. तसेच होऊ घातलेल्या मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर महापालिकेच्या दृष्टीने पायाभरणी देखील केली. त्याचदरम्यान त्यांनी भाजपसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर तोफ डागली. तर पहाटेच्या शपथविधीवरून (Morning Oath) ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना डिवचले आहे. त्यानंतर आज त्याच मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून पलटवार करत भाष्य केलं आहे. तसेच ते म्हणाले, माझा सकाळचा शपथविधी केला, तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. तर या शपथविधीला आता अडीच वर्ष ओलांडून गेले असले तरीही आज तो आठवला जात आहे. प्रत्येक राजकीय सभेत त्याचा उल्लेख केला जात आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांचा पारा चढल्याचे दिसून आले आहे. तर या शपथविधीने अजितदादांचा पिच्छा काही सोडलेला दिसत नाही. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 15, 2022 11:18 PM

Follow Us