अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील पेट्रोल पंप चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवस आधी शिवप्रेमींनी बसवला होता. मध्यरात्री हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला आहे. ज्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला ती जागा खाजगी असून विनापरवाना पुतळा या ठिकाणी बसविण्यात आला. त्यामुळे रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे