अंबादास दानवे यांचा प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत लेटरबॉम्ब, थेट लिहिलं फडणवीस यांना पत्र अन्…
अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे अंबादास दानवे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत लेटरबॉम्ब टाकला आहे. ते म्हणाले, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद पण...
मुंबई, ८ डिसेंबर २०२३ : राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे अंबादास दानवे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत लेटरबॉम्ब टाकला आहे. ते म्हणाले, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीव्र भावना वाचून आनंद झाला. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. गोंदिया विमानतळावर पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ‘ईडी’ने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत, त्या प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे, असे पत्र अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.