महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात 12 जणांचा मृत्यू; ट्विट करत अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया
Amit Shah on Maharashtra Bhushan Award ceremony 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात 12 जणांचा मृत्यू; अमित शाह ट्विट करत म्हणाले...
मुंबई : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम काल दुपारी पार पडला. या सोहळ्यात उष्मघातामुळे अनेक श्री सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. यावर अमित शाह यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत. “काल झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना उष्माघाताने प्राण गमावलेल्या श्रीसदस्यांच्या जाण्याने, माझे मन जड झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे लोक उपचार घेत आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो”, असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..

