Amit Shah | नागालँडच्या घटनेवर अमित शाह यांचं निवदेन – अमित शाह

नागालँडमध्ये जवानांनी केलेल्या गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावर दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देत स्पष्टीकरण दिलं आहे. चुकीची ओळख निघाल्यानं ही गोळीबाराची घटना घडली होती.

नागालँडमध्ये जवानांनी केलेल्या गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावर दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देत स्पष्टीकरण दिलं आहे. चुकीची ओळख निघाल्यानं ही गोळीबाराची घटना घडली होती. घटनेनंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर नागालँडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं, या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती अमित शाह यांनी त्यांच्या निवेदनातून दिली आहे.

जवानांनी गाडी थांबवायला सांगितल्यावरही गाडी थांबली नाही, त्यामुळे जवानांचा समज चुकीचा झाला. चुकीची ओळख झाली आणि त्यातून ही घटना घडली असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. जवानांनी दहशतवादी समजून गोळीबार केला. त्यात सहा मजुरांसह एकूण 14 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागालँडमध्ये दंगल उसळली होती. त्या दंगलीत एका जवानाचाही मृत्यू झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI