अमित ठाकरेंचा दादर ते अंबरनाथ लोकलने प्रवास!
कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या आगमनासाठी जंगी तयारी केली आहे. प्राचीन शिव मंदिरात जाऊन दुग्धअभिषेक करून त्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) आपल्या संवाद दौराला सुरुवात करतील.
अंबरनाथ : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या सर्वत्र दौरा करत आहेत. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज या दौऱ्यासाठी दादर ते अंबरनाथ लोकलने (Local) प्रवास केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्या आगमनासाठी जंगी तयारी केली आहे. प्राचीन शिव मंदिरात जाऊन दुग्धअभिषेक करून त्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) आपल्या संवाद दौराला सुरुवात करतील. त्यांच्या उपस्थितीत अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मनसेत प्रवेश करणार आहेत.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

