“मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिरंजीवांचं उद्विग्नतेतून वक्तव्य”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. डोंबिवलीतील शिवसेना-भाजप युतीतील वादावरून अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. डोंबिवलीतील शिवसेना-भाजप युतीतील वादावरून अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील विसंवाद हा सातत्याने चव्हाट्यावर येतोय. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना सुद्धा जर उद्विगीनेतून काही स्टेटमेंट द्यावी लागत असतील, तर हे विसंवादाचे दिव्यत्व आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे मी विधान सोशल मीडियातून ऐकलं. मुख्यमंत्री महोदयांच्या चिरंजीवांवर आणि एक दोन टर्म चांगली कामगिरी करणाऱ्या खासदारांवर अशी परिस्थिती ओढवली जात आहे. यातून नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात दुफळी आहे हे सरळ सरळ उदाहरण आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

