पुन्हा ‘मविआ’मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना “इन्फ्रामॅन” म्हणून ओळखलं जात असल्याचं म्हणत थेट मोठी खळबळ उडावली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना “इन्फ्रामॅन” म्हणून ओळखलं जात असल्याचं म्हणत थेट मोठी खळबळ उडावली.
राष्ट्रावदी शरद पवार गटातील अमोर कोल्हे त्यांच्या एका विधानाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, “भविष्यातील केंद्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये काही नावांची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होत असते. त्यामध्ये मराठी माणसाचं नाव घेतलं जात असेल तर ती चांगली गोष्ट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव जसं आदराने घेतलं जातं, तसंच देवेंद्र फडणवीस यांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून घेतलं जातं.”
दरम्यान, पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. “अशी ऑफर माझ्याकडे अद्याप आलेली नाही. पण भविष्यात अशी ऑफर आली तर विचार करु. मी विचार करु असं म्हटलं आहे, जाऊ असं नाही,” असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Jul 02, 2026 09:19 AM
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...

