AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं

लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच… अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं

| Updated on: Aug 26, 2026 | 3:24 PM
Share

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरणाच्या चौकशीवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी घटनास्थळाची पाहणी केली आणि चौकशी समितीचे प्रमुख आरोग्य आयुक्त संजय काटकरांशी संवाद साधला. यावेळी अंधारेंनी चौकशीतील दिरंगाई आणि मागील घटनांची आठवण करून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी तात्काळ कार्यवाहीची मागणी केली.

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाला आग लागल्याच्या प्रकरणावरून आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या चौकशी समितीचे प्रमुख आरोग्य आयुक्त संजय काटकर यांचा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबतचा संवाद समोर आला आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये पाहणी केल्यानंतर सुषमा अंधारेंनी चौकशीतील दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. संवादामध्ये सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना सांगितले की, त्यांना दोन तासांपासून कारणे सांगितली जात आहेत, ज्यामुळे कामात विलंब होत आहे.

“एवढे जर दोन-दोन तास जर तुम्ही पेशंट बघणारे असाल तर पेशंट मेले कशानं असते?” असा संतप्त सवाल अंधारेंनी केला. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी याच रुग्णालयात अशीच घटना घडली होती, याची आठवण करून देत अंधारेंनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी काटकरांना लाईव्ह लोकेशन विचारत स्वतः भेटायला येण्याची तयारी दर्शवली आणि तात्काळ व्हिडिओ कॉल करण्याची मागणी केली. रुग्णालयाच्या कामकाजातील ही दिरंगाई लोकांच्या जिवाशी खेळणारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या घटनेच्या चौकशीत तत्परता दाखवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Aug 26, 2026 03:24 PM

Follow Us